![]() |
| कोमट मिठाच्या पाण्यात पाय भिजवण्याचे आरोग्यदायी फायदे |
हिवाळा सुरु झाला की शरीरातील रक्ताभिसरण मंदावते आणि विशेषतः पाय थंड पडण्याची समस्या जास्त जाणवते. दिवसभर चालणे, उभे राहणे किंवा कामाचा ताण यामुळे पायांमध्ये वेदना, सूज, जडपणा किंवा थकवा जाणवू लागतो. अशा वेळी अनेक घरांमध्ये वापरला जाणारा आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेला एक सोपा उपाय म्हणजे पाय कोमट मिठाच्या पाण्यात ठेऊन बसने. हा उपाय साधा असला तरी त्याचे परिणाम शरीराला प्रत्यक्षात मिळते.
दिवसभराच्या कामानंतर काही मिनिटे कोमट पाण्यात मीठ टाकून यामध्ये पाय भिजत ठेवले की संपूर्ण शरीर हलके वाटते आणि दिवसभराचा थकवा निघून जातो, पायांतील ताण कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि मनही शांत होते. हिवाळ्यात तर या उपायाचे फायदे आणखी वाढतात कारण कोमट पाण्यामुळे पाय उबदार राहतात आणि थंडीमुळे होणारी कडकपणा किंवा जडपणा कमी होतो. चला तर मग कोमट मिठाच्या पाण्यात पाय भिजवण्याचे आरोग्यदायी फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया.
ज्या लोकांना दिवसभर उभे राहून काम करावे लागते अशा लोकांसाठी हा उपाय विशेषतः खूप उपयुक्त आहे. कारण सतत उभे राहिल्याने पायांवरील दाब वाढतो आणि रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे मीठ घातलेल्या कोमट पाण्यामुळे तो पुन्हा सामान्य होण्यास मदत होते.
त्यामुळे कोमट मिठाच्या पाण्यात पाय भिजवल्याने पायातील स्नायूंना आराम मिळते. स्नायू मोकळे झाल्यानंतर थकवा कमी होतो आणि शरीरात हलकेपणा जाणवतो. घरात परतल्यावर १० ते १५ मिनिटे पाय कोमट पाण्यात ठेवणे हा दिवस संपवण्याचा एक उत्तम आणि मनशांती देणारा उपाय आहे.
अशावेळी कोमट मिठाचे पाणी पाय गरम ठेवण्यास मदत करतं. कोमट पाण्यामुळे:
हिवाळ्यात हा उपाय आठवड्यातून किमान काही वेळा केला तरी पायांची थंडी आणि जडपणा कमी जाणवतो आणि पायांना आराम मिळतो.
मीठ पाण्यात मिसळले की ते त्वचेमार्फत शरीरावर काही सकारात्मक परिणाम करते:
विशेषतः ज्यांचे दिवसभर शूजमध्ये पाय असतात त्यांना पायाच्या दुर्गंधीची तक्रार जास्त असते, त्यांच्यासाठी मिठाचे पाणी उपयुक्त ठरते.
कोमट पाण्यात पाय भिजवल्याने:
शारीरिक आराम आणि मानसिक शांतता यांचा हा सुंदर संगम असल्यामुळे हा उपाय दिवसाच्या शेवटी करणे उत्तम मानले जाते.
यामागील कारण असे की:
यासोबत कपाळावर थंड पट्टी वापरल्यास आणखी फायदा मिळतो. मात्र हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हा उपाय ताप कमी करण्यासाठी एक पूरक उपाय आहे, औषधांचा पर्याय नाही.
नियमितपणे हा उपाय केल्यास:
टीप: हा लेख माहितीपुरता आहे. कोणतीही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दिवसभराच्या कामानंतर काही मिनिटे कोमट पाण्यात मीठ टाकून यामध्ये पाय भिजत ठेवले की संपूर्ण शरीर हलके वाटते आणि दिवसभराचा थकवा निघून जातो, पायांतील ताण कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि मनही शांत होते. हिवाळ्यात तर या उपायाचे फायदे आणखी वाढतात कारण कोमट पाण्यामुळे पाय उबदार राहतात आणि थंडीमुळे होणारी कडकपणा किंवा जडपणा कमी होतो. चला तर मग कोमट मिठाच्या पाण्यात पाय भिजवण्याचे आरोग्यदायी फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया.
१) कोमट पाण्याने रक्ताभिसरण सुधारते
पाय मीठ घातलेल्या कोमट पाण्यात ठेवले की त्वचेखालील रक्तवाहिन्या हळूहळू प्रसारित होऊ लागतात. या प्रक्रियेमुळे पायांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि रक्ताभिसरण सुधारल्याने पुढील फायदे होऊ होतात:- पायातील ताण आणि वेदना कमी होणे
- पायातील कडकपणा कमी होणे
- स्नायूंना आराम मिळणे
- सुई टोचल्यासारखी भावना किंवा सुन्नपणा घटणे
ज्या लोकांना दिवसभर उभे राहून काम करावे लागते अशा लोकांसाठी हा उपाय विशेषतः खूप उपयुक्त आहे. कारण सतत उभे राहिल्याने पायांवरील दाब वाढतो आणि रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे मीठ घातलेल्या कोमट पाण्यामुळे तो पुन्हा सामान्य होण्यास मदत होते.
२) दिवसभराचा थकवा दूर होतो
पाय हे शरीराचे वजन सांभाळत असतात. चालणे, जिने चढणे किंवा सतत उभे राहणे या सर्व क्रियांचा भार पायांवरच पडतो. त्यामुळे दिवसाच्या शेवटी पायांना थकवा येणे स्वाभाविकच आहे.त्यामुळे कोमट मिठाच्या पाण्यात पाय भिजवल्याने पायातील स्नायूंना आराम मिळते. स्नायू मोकळे झाल्यानंतर थकवा कमी होतो आणि शरीरात हलकेपणा जाणवतो. घरात परतल्यावर १० ते १५ मिनिटे पाय कोमट पाण्यात ठेवणे हा दिवस संपवण्याचा एक उत्तम आणि मनशांती देणारा उपाय आहे.
३) हिवाळ्यात पाय गरम आणि आरामदायी राहतात
थंडी वाढली की रक्ताभिसरणाची गती कमी होते. याच कारणामुळे अनेकांच्या पायांना थंडी जाणवते किंवा ते सुन्न पडतात. काहींना कधीकधी वेदना किंवा कळाही येतात.अशावेळी कोमट मिठाचे पाणी पाय गरम ठेवण्यास मदत करतं. कोमट पाण्यामुळे:
- पायातील रक्तप्रवाह वाढतो
- थंडीमुळे होणारा कडकपणा कमी होतो
- स्नायू मोकळे होतात
- पाय उबदार राहतात
हिवाळ्यात हा उपाय आठवड्यातून किमान काही वेळा केला तरी पायांची थंडी आणि जडपणा कमी जाणवतो आणि पायांना आराम मिळतो.
४) मिठाचे विशिष्ट फायदे
कोमट पाण्यात मीठ घातल्याने त्याचे फायदे अधिक वाढतात. वापरले जाणारे दोन मुख्य प्रकार म्हणजे:- एप्सम मीठ (मॅग्नेशियम सल्फेट)
- सिंधव मीठ (पिंक सॉल्ट)
मीठ पाण्यात मिसळले की ते त्वचेमार्फत शरीरावर काही सकारात्मक परिणाम करते:
- पायातील सूज कमी होण्यास मदत होते
- जळजळ किंवा चिडचिड कमी होणे
- पायातील अशुद्धता बाहेर पडणे
- दुर्गंधी कमी होणे
- त्वचा मऊ होणे
विशेषतः ज्यांचे दिवसभर शूजमध्ये पाय असतात त्यांना पायाच्या दुर्गंधीची तक्रार जास्त असते, त्यांच्यासाठी मिठाचे पाणी उपयुक्त ठरते.
५) ताण आणि मानसिक थकवा कमी होतो
आपल्याला वाटतं की पाय हा फक्त शरीराचा एक भाग आहे, पण पायांमधील ताणाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जेव्हा पाय मोकळे आणि रिलॅक्स होतात, तेव्हा मनही शांत व्हायला सुरुवात होते.कोमट पाण्यात पाय भिजवल्याने:
- शरीरातील ताण कमी होतो
- मन शांत होतं
- मानसिक थकवा दूर होतो
- झोप सुधारण्यास मदत मिळते
शारीरिक आराम आणि मानसिक शांतता यांचा हा सुंदर संगम असल्यामुळे हा उपाय दिवसाच्या शेवटी करणे उत्तम मानले जाते.
६) ताप कमी करण्यासाठी पारंपरिक वापर
मिठाच्या गरम पाण्यात पाय ठेवल्याने शरीरातील उष्णता समतोल राहण्यास मदत होते. हा उपाय आजही अनेक घरांमध्ये ताप कमी करण्यासाठी वापरला जातो.यामागील कारण असे की:
- गरम पाण्यात पाय ठेवल्याने तळपायातील नाड्या सक्रिय होतात
- शरीरातील अतिरिक्त उष्णता खाली येण्यास मदत होते
- डोक्यातील तापमान थोडे कमी होते
यासोबत कपाळावर थंड पट्टी वापरल्यास आणखी फायदा मिळतो. मात्र हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हा उपाय ताप कमी करण्यासाठी एक पूरक उपाय आहे, औषधांचा पर्याय नाही.
७) त्वचेची देखभालही होते
दिवसभर पाय शूजमध्ये राहिल्यामुळे त्वचा कोरडी पडणे किंवा तडकणे हे त्रास दिसतात. कोमट मिठाचे पाणी त्वचेवरील मृत पेशी मऊ करण्यास मदत करते.नियमितपणे हा उपाय केल्यास:
- टाचा मऊ राहतात
- त्वचेतील कोरडेपणा कमी होतो
- पाय सुंदर व स्वच्छ दिसतात
हा उपाय कसा करावा?
- एका थाळीत किंवा बादलीत कोमट पाणी घ्या.
- पाण्याचे तापमान ना खूप गरम ना खूप थंड — स्पर्शाला सुखद असावे.
- त्यात दोन ते तीन चमचे एप्सम किंवा सिंधव मीठ घाला.
- पाय 10 ते 15 मिनिटे पाण्यात ठेवा.
- नंतर टॉवेलने पाय पुसून कोरडे करा.
- हलका मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा मऊ राहते.
कधी काळजी घ्यावी?
- त्वचेवर जखम किंवा खोल तडे असतील तर गरम पाणी टाळावे
- मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- पायांवर संसर्ग असेल तर हा उपाय करू नये
निष्कर्ष
तर मित्रांनो, आपण वरील माहितीमध्ये बघितले कि कोमट मिठाच्या पाण्यात पाय भिजवण्याचे आरोग्यदायी फायदे कोणकोणते आहेत. पाय कोमट मिठाच्या पाण्यात भिजवणे हा एक अगदी साधा पण प्रभावी घरगुती उपाय आहे. थकवा, वेदना, सूज, पायांची थंडी, त्वचेचे प्रश्न, तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी हा उपाय नैसर्गिक आणि सुरक्षित मानला जातो. कोणतेही औषध न घेता, फक्त काही मिनिटांत शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होतं.टीप: हा लेख माहितीपुरता आहे. कोणतीही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

0 टिप्पण्या