![]() |
| Image from Pixabay |
रोज एक बिअर पिल्यावर काय होईल? : आजकाल अनेकजण दिवसभराच्या कामाच्या धावपळीतून घरी परतल्यावर थकवाचं ओझं कमी करण्यासाठी एक बिअर घेतात. काही लोकांना तर वाटतं की रोज एक बिअर पिण्यात काहीच चुकीचे नाही. उलट त्यातून शरीराला थोडाफार फायदा होतो असेही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. पण हे तितकच खरं आहे का? रोज एक बिअर पिण्यामुळे शरीरात नेमके कोणते बदल होतात, त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम काय असू शकतात, आणि ते दीर्घकाळात आरोग्यावर कसे प्रभाव टाकतात हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच या लेखात आपण रोज एक बिअर घेतल्यावर शरीरावर काय परिणाम होतात, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि ही सवय कायम ठेवणं योग्य आहे का, हे अगदी साध्या आणि स्पष्ट भाषेतसमजून घेऊया.
रोज एक बिअर पिल्याचे फायदे
मन शांत होते
बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असतं. त्यामुळे मनाला थोडी शांतता मिळते. दिवसभराचा ताण कमी झाल्यासारखे वाटते. परंतु हा परिणाम तात्पुरता असला तरी बऱ्याच लोकांना तो आरामदायी वाटतो.मूड चांगला राहतो
अल्कोहोलमुळे डोपामाइनची पातळी थोडी वाढते. ज्यामुळे डोपामाइनची पातळी वाढली कि मूड रिलॅक्स होतो. मात्र हे प्रमाण खूप कमी असते आणि ते सर्वांसाठी समान नसते.हृदयाला मर्यादित फायदा मिळतो
काही अध्ययनांनुसार अत्यल्प प्रमाणातील अल्कोहोलमुळे हृदयाची रक्तवाहिनी शिथील होण्यास मदत होऊ शकते. पण हे मर्यादित आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी हमखास फायदेशीर असल्याचे पुरावे नाहीत.रोज एक बिअर पिल्याचे दुष्परिणाम
झोपेची गुणवत्ता घसरते
बिअर घेतल्यावर झोप पटकन येते, पण खोल झोप कमी होते. दिवसभर थकवा जाणवणे, मेंदूची कार्यक्षमता कमी होणे असे परिणाम दिसू शकतात.वजन वाढण्याची शक्यता
बिअरमध्ये कॅलरी जास्त असतात. “लिक्विड कॅलरीज” लक्षातही राहत नाहीत. रोज एक बिअर घेतल्याने पोटाची चरबी वाढणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे.लिव्हरवर ताण वाढणे
अल्कोहोल कमी प्रमाणात असले तरी ते रोज घेतल्यास लिव्हरला सतत प्रोसेस करावे लागते. ज्यामुळे दीर्घकाळात fatty liver किंवा इतर लिव्हर समस्या होऊ शकतात.मेंदूवर परिणाम
दररोज अल्कोहोल घेतल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यावर परिणाम होऊ शकतो.सवय लागण्याचा धोका
रोजची बिअर ही सहज सवय बनू शकते. नंतर त्याशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागतो, जे व्यसनाचा पहिला टप्पा आहे.डिहायड्रेशन
बिअर मूत्राच्या प्रमाणात वाढ करते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू शकते.कोणाला रोज बिअर पिणे अजिबात चालत नाही?
- लिव्हरचे आजार असलेले लोक
- मधुमेह असलेले लोक
- उच्च रक्तदाब असलेले लोक
- झोपेच्या समस्या असलेले
- गर्भवती स्त्रिया
- ज्यांना व्यसनाची प्रवृत्ती जास्त आहे

0 टिप्पण्या